बदलत्या काळानुसार आपली वाचनाची पद्धत देखील बदला…
आजच्या आधुनिक तरूण पिढीला पुस्तक हातात घेऊन वाचनाची सवय नसल्याचे दिसून येते. याचे कारण सतत हातात असलेला मोबाईल. सर्वच कामे मोबाईलवर होत असल्याने, पुस्तक हातात घ्यायला व वाचायला वेळ काढता येत नाही. म्हणूनच आम्ही चांगल्या लेखकांची दर्जेदार पुस्तके फक्त ऑनलाईन वाचण्यासाठी घेऊन आलो आहोत.
या संकेतस्थळावर आपण आपल्या सोयीनुसार विविध विषयावरील पुस्तके वाचू शकता. इतकेच नाही तर आपण आपले लिखाण देखील एखाद्या पुस्तक स्वरूपात या संकेतस्थळावर इतरांना वाचनासाठी उपलब्ध करु शकता.
या संकेतस्थळाचा उद्देश असा आहे की ज्या लेखकांना आपण लिहीलेले साहित्य, पुस्तक स्वरूपात छापणे किंवा ऑनलाईन मधमाद्वारे वाचकांपर्यंत कसे पोहचवायचे हे माहित नाही किंवा जमत नाही, अश्या लेखकांसाठी हे संकेतस्थळ हे एक वरदान आहे. प्रसिद्धी बरोबरच आर्थिक उत्पन्न सुध्दा लेखकांना मिळेल.
ह्या संकेतसथळावरील पुस्तके दोन प्रकारे उपलब्ध आहेत. एक मोफत वाचण्यासाठी व दूसरी माफक दरात विकत घेवून वाचण्यासाठी.
आपण पुस्तक वाचल्यावर आपला अभिप्राय नक्की लीहा. पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यंत व लेखकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्हाला सहकार्य करा.
आमच्या पुस्तकांची वैशिष्ट्ये
फक्त दर्जेदार पुस्तकेच या संकेतस्थळावर आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
एकदा विकत घेतल्यावर ते पुस्तक ६ महिन्यासाठी आपल्या खात्यात जमा असेल. म्हणजेच एखादे पुस्तक वाचण्याचा कालावधी ६ महिन्यांचा असेल.
आपण एखाद्या दिवसातून कितीही तास आणि कितीही वेळा पुस्तक पाहू/वाचू शकता. आपण जर अनेक पुस्तके विकत घेतली असतील तरी ती सर्व पुस्तके आपण कितीही वेळा वाचू शकता. त्याचसोबत आपण मोफत उपलब्ध असलेली पुस्तके देखील कितीही वेळा पुस्तक पाहू/वाचू शकता.
पेमेंट करताना चुकून बँक खात्यातून पैसे कट झाले परंतु आपल्या खात्यात ते पुस्तक दाखवत नसल्यास काळजी करू नका. त्याची माहिती आम्हाला द्या आणि तुम्हाला मदत करू.
नक्कीच, या संकेतस्थळावर इतर लेखकांची पुस्तके देखील ठेवता येतील. त्यासंबंधी अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.
एखादे पुस्तक विकत घेताना आपण वापरलेले लॉगीन वापरून इतर ठिकाणाहून देखील पुस्तके वाचू शकता.
इतर चौकशी करा
नवीन आलेली पुस्तके






